आमच्याबद्दल

‘साप्ताहिक तळोदा वेध खबर’ हे केवळ एक वृत्तपत्र नाही, तर सत्य, समाजहित आणि लोकशाही मूल्यांप्रती कटिबद्ध असलेले विश्वासार्ह पत्रकारितेचे सशक्त व्यासपीठ आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बुलंद करण्याचा आणि वास्तव परिस्थिती समाजासमोर मांडण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
निडर, निष्पक्ष आणि निष्कर्ष पत्रकारितेचा ध्यास घेत २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या प्रेरणादायी मुहूर्तावर तळोदा शहरातून “साप्ताहिक तळोदा वेध खबर” ची स्थापना करण्यात आली. समाजातील घडामोडींकडे अभ्यासपूर्ण दृष्टीकोनातून पाहत लोकहिताला प्राधान्य देणे हीच आमची कार्यसंस्कृती आहे.

आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न, सामाजिक बदल, शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि विकासात्मक विषय यांना न्याय देणे आणि सामान्य नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना योग्य मंच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.
डिजिटल युगातील विश्वासार्ह माध्यम आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.