साप्ताहिक वृत्तपत्र

तळोदा वेध खबर – २१ फेब्रुवारी २०२६

पान क्रमांक – १ पान क्रमांक – २ पान क्रमांक – ३ पान क्रमांक – ४ तळोदा वेध खबरआजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये […]

गुन्हेगारी तळोदे नंदुरबार महाराष्ट्र

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातील सोलर कामात भ्रष्टाचाराचा संशय
निकृष्ट दर्जाचे काम; कोट्यवधींच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

तळोदा : शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ व प्रभाग क्रमांक ७ ते ९ मध्ये बसविण्यात आलेल्या सोलर पथदिव्यांचा मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक दिवे सुरुवातीपासूनच बंद पडणे, काही दिवसांतच बॅटरी निकामी होणे तसेच तांत्रिक दोष आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सप्टेंबर […]

तळोदे धर्म स्थानिक वार्ता

तळोदा शहरात शिवभक्तांच्या कलश यात्रेने वेधले लक्ष

तळोदा : शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन काढलेल्या यात्रेने लक्ष वेधून घेतले.       तळोदा शहरातील आशिष पार्क परिसरात  श्री देवेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव […]

तळोदे महाराष्ट्र स्थानिक वार्ता

मेवासी वन विभागातील संबंधित वनपालावर कारवाई करा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गावजोड रस्ता व साकव पुल बांधकाम त्वरित करण्याची मागणी तळोदा :  तालुक्यातील कुवलीडाबर व पाल्हाबार येथील ग्रामस्थांनी गावाला जाण्यासाठी रस्ता व साकव पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच मेवासी वन विभागातील संबंधित वनपालावर कारवाई करावी, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.      निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दोन्ही गावांपर्यंत […]

अभिवादन नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव

शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर

तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

तळोदे स्थानिक वार्ता

तळोदा येथे श्री देवेश्वर महादेव मंदिरात मूर्ती स्थापना महोत्सवाचे आयोजन

तळोदा : शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.     फाल्गुन शुद्ध १ बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ […]

नंदुरबार विद्यार्थी कॉर्नर

योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.          महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर […]

नंदुरबार महाराष्ट्र शेतकरी

प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग राजपूत जाणार युरोप कृषी अभ्यास दौऱ्यावर

तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे.       कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वर्षी युरोपच्या कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड आदी […]

अक्कलकुवा विद्यार्थी कॉर्नर शैक्षणिक

मोलगी येथे इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मोलगी : इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, मोलगी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा (पोलीस स्टेशन मोलगी) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल वसावे, संस्था संचालक भरत वसावे, रायसिंग पाडवी, अ‍ॅड. रामचंद्र वसावे, सुमित्रा वसावे, मानसिंग वसावे, किसन पाडवी, ब्रिजलाल […]

गुन्हेगारी तळोदे स्थानिक वार्ता

प्रकल्प कार्यालयात  अधीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा, पोलिसांत गुन्हा

तळोदा | प्रतिनिधीतळोदा येथील प्रकल्प कार्यालयात दारूच्या नशेत येऊन आरडाओरड व दमदाटी केल्याप्रकरणी संग्राम मारोती परसोडे (अधीक्षक, शासकीय आश्रमशाळा सरी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.     याबाबत तक्रारदार तुषार राम दुर्वे (वय २९), कनिष्ठ लिपिक, प्रकल्प […]