तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे.
कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वर्षी युरोपच्या कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड आदी देशांतील अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञान केले जाणारी शेती याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये धान्य पीक शेती, आधुनिक दुग्धशाळा, स्थानिक तंत्राशी चर्चा, द्राक्ष बाग, वाइन प्रक्रिया पाहणी, वायनरी संशोधन केंद्र पाहणी, दुग्ध प्रक्रिया संस्थांना भेटी, पर्यावरणीय दृष्टिकोन, चाराई पद्धती, उच्च प्रतीतील पशुपालन, बीज प्रक्रिया केंद्र पाहणी, हॉर्न-लॉज विद्यापीठ संशोधन केंद्र भेट (जर्मनी), दुग्ध संशोधन केंद्र व पारंपरिक दुग्धशाळा भेट, आॅल्मेट फूड बाजार, आधुनिक हरितगृह, मत्स्यपालन प्रकल्प पाहणी, बागायती इनोव्हेशन सेंटर आदींची पाहणी समाविष्ट आहे.दौरा दि. १६ ते २७ फेब्रुवारी असा १२ दिवसांचा असणार आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




