धडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे बनावट देशी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की, सुनिल हात्या पाडवी हा इसम कुडाच्या झोपडीच्या […]
खानदेश
तळोदा येथे टीबी हारेगा, देश जीतेगा’चा नारा; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन
तळोदा वेध खबरआजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. talodavedhkhabar.com
शिक्षिकांप्रती महिला दिनानिमित शिक्षण विभागाची अनोखी कृतज्ञता
१०० शिक्षकांचा सन्मान ; वैद्यकीय मार्गदर्शन तळोदा : शिक्षण विभाग तळोदा यांच्या प्रेरणेने महिला दिनानिमित्त तालुक्यातील 100 महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बुधावल (ता. तळोदा) येथे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या प्रेरणेने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला डागा हॉस्पिटलच्या प्राची जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, […]
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातील सोलर कामात भ्रष्टाचाराचा संशय
निकृष्ट दर्जाचे काम; कोट्यवधींच्या योजनेवर प्रश्नचिन्ह
तळोदा : शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ व प्रभाग क्रमांक ७ ते ९ मध्ये बसविण्यात आलेल्या सोलर पथदिव्यांचा मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक दिवे सुरुवातीपासूनच बंद पडणे, काही दिवसांतच बॅटरी निकामी होणे तसेच तांत्रिक दोष आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सप्टेंबर […]
नंदुरबारमध्ये द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव
शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर
तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने […]
योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर […]
प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग राजपूत जाणार युरोप कृषी अभ्यास दौऱ्यावर
तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वर्षी युरोपच्या कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड आदी […]
वाळू परवान्यांच्या जटिल अटींमुळे रेती तुटवडा वाढला
अटी शिथिल करा; रेती व्यवसायिक व तरुणांची प्रशासनाकडे मागणी
तळोदा : महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी वाळू निर्गती धोरणात सुधारित तरतुदी जाहीर केल्या. परराज्यातून येणाऱ्या वाळूच्या सनियंत्रणासाठी महाखनिज प्रणालीद्वारे काटेकोर प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून परराज्यातील उत्खनन किंवा डेपो परवाना तसेच वार्षिक वाहतुकीचे प्रमाणपत्र पत्रासह अन्य कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय गुजरात राज्यातून याकरिता परवानगी बंधनकारक केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी […]
तळोद्यात कन्याजन्माचे स्वागत अनोखे स्वागत
मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभ तळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या मुलींच्या […]
अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]










