जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी १०४१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक निकालानुसार अभिजीत पाटील यांना एकूण १८,७९८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मकरंद पाटील यांना १७,७५८ मते प्राप्त झाली. मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेरीस जनता विकास आघाडीने बाजी मारली. […]
खानदेश
मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले
धुळे – महापालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची मोठी कसोटी लागली होती. निवडणुकीच्या तोंडावर ‘सोयीचे राजकारण’ करत तंबूत शिरलेल्या उमेदवारांना मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. यात पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या ९ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी १४ जणांना मात्र पराभवाची नामुष्की सोसावी लागली आहे. शहरातील १९ प्रभागातील ७० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपामध्ये ५५० […]
“राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस…”, दादांनी सहकाऱ्याला केलं होतं सावध, पण…
“राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस…” हे शब्द होते दिवंगत अजित पवार यांचे. आपल्या सहकाऱ्याची मोठ्या भावासारखी काळजी करणाऱ्या दादांच्या या सल्ल्याची आठवण सांगताना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार धुळ्यात आल्यावर हक्काने कदमबांडे यांच्याकडे जेवायला थांबत असत. एका जेवणाच्या पंगतीवर गप्पा मारताना दादांनी राजवर्धन यांना सुरक्षेच्या कारणास्तव छोट्या विमानाने […]
शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर साकरी गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले होते. साकरी येथील दोन अल्पवयीन मुली […]
शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद
नोकऱ्या आहेत, ती करण्याची मानसिकता नाही. बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता. मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही. कोण म्हणत आहे की, काम नाही. काम आहे. तरुणांना राग आला तर आला. कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचे तेव्हा बघ, असे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]





