नंदुरबार

२९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे

जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी १०४१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.

निवडणूक निकालानुसार अभिजीत पाटील यांना एकूण १८,७९८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मकरंद पाटील यांना १७,७५८ मते प्राप्त झाली. मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेरीस जनता विकास आघाडीने बाजी मारली. शहादा नगरपालिकेतील २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. तर जनता विकास आघाडीला ९ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी अभिजीत पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *