गोंदिया : महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील बेस कॅम्प मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपविलेला शस्त्रसाठा व स्फोटके गोंदिया पोलिसांनी हस्तगत केली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राबविलेल्या अभियानात एके-४७, एसएलआरसह अनेक शस्त्रे व स्फोटक साहित्य सापडल्याची माहिती शुक्रवारी (दि. ३०) गोंदिया पोलिस दलाने दिली. महाराष्ट्र शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली […]

