बुलढाणा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कंत्राट ‘सॅम […]