अक्राणी गुन्हेगारी नंदुरबार

धडगावात बनावट दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

धडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे बनावट देशी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की, सुनिल हात्या पाडवी हा इसम कुडाच्या झोपडीच्या आडोशाला मानवी आरोग्यास अपायकारक स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करत आहे. या माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाईची योजना आखली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव पोलीस ठाण्याच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला. घटनास्थळी तपासणी केली असता बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, स्पिरिट, ‘टँगो पंच’ तयार करण्याचे साहित्य, खाकी रंगाचे बॉक्स व पांढऱ्या रंगाच्या गोण्या असा एकूण 1 लाख 52 हजार 304 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 123/2026 नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, सजन वाघ व यशोदिप ओगले यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *