तळोदा : ‘जागतिक क्षयरोग दिना’निमित्त येथील नॅशनल हायस्कूलमध्ये भव्य जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना क्षयरोग हा लपवण्याचा आजार नसून त्यावर वेळेत उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. शासनामार्फत मिळणारे मोफत उपचार व ‘निक्षय पोषण’ योजनेचा लाभ घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘आरोग्यदूत’ म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी जनजागृती मोहिमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक एजाज कुरेशी यांनी भूषविले. व्यासपीठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पटले, डॉ. गोविंद शेल्टे यांच्यासह सुनील वाघ, दिलीप पाटील, गुलाब बावा, देवेंद्र राठोड, कस्तुभ बडोदेकर, धीरसिंग वळवी व बाळू पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची रॅली होय. विशेष टी-शर्ट परिधान करून विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून शिस्तबद्ध रॅली काढली. “क्षयरोग टाळा, आरोग्य जपा” व “टीबी हारेगा, देश जीतेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिता पाटील, हेमलता वळवी, भारती कापसे, शब्बीर मन्सूरी, जुबेर अन्सारी, इरफान शेख, खालिद सय्यद, इरफान सय्यद, मोहसीन शेख, नाजनीन पठाण, रुकय्या खान, वसीम खाटीक, तौसिफ मन्यार, हमीद शेख व जुबेर लष्करी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर अन्सारी यांनी केले, तर आभार शब्बीर मन्सूरी यांनी मानले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
“बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश डी. माने, दिवाणी न्यायाधिश क. स्तर, तळोदा उपस्थिती सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच, सर्व विधीज्ञ तळोदा वकील संघ सदरीकरण विद्यार्थी महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा. बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडुन बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखुन दिलेल्या NALSA […]
अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]
तळोदा : कोठार ता.तळोदा येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आपल्या मुलांनी व्यक्त केलेल्या अनोख्या कृतज्ञतेने पालक भारावून गेले. श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी कोठार येथील आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला जातो. बुधवारी बुधवारी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश वाणी होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक […]