“बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर
कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री. दिनेश डी. माने, दिवाणी न्यायाधिश क. स्तर, तळोदा
उपस्थिती सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच, सर्व विधीज्ञ तळोदा वकील संघ सदरीकरण विद्यार्थी महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा.
बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडुन बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखुन दिलेल्या NALSA ASHA (Awareness, Support, Help & Action) २०२५ मानक कार्यवाही प्रक्रियेनुसार बालविवाह मुक्त भारतासाठी १०० दिवसीय जनजागृती मोहीमे अंतर्गत अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, तळोदा तथा दिवाणी न्यायाधिश, तळोदा श्री. दिनेश डी माने यांच्या आदेशान्वये महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा येथील एकुण १४ विद्यार्थी-विद्यार्थ्यांणीनी बस स्थानक, तळोदा येथे बालविवाहामुळे समाजावर तसेच, बालक / बालीकेच्या मनावर व शरीरावर होणारे विपरीत परिनाम याबाबत पथनाट्याव्दारे जनजागृती केली. तसेच, १८ वर्षाखालील मुलीचे व २१ वर्षाखालील मुलाचा विवाह हा बालविवाह आहे. अशा विवाहाचे आयोजन करणे, असा विवाह घडवुन आणणे, किंवा त्यात सहभागी होण हा बालविवाह प्रतिबंध अधि. २००६ अंतर्गत दंडनीय अपराध आहे. बाल विवाहाची माहीती मिळाल्यास चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सदर पथनाट्य सादरकरणांत विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री. प्रमोद एच. जाधव, यांचे अमुल्य मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच, तालुका विधी सेवा समिती, तळोदा येथील श्री. दिपक ए. चौधरी क. लिपीक यांनी संयोजक म्हणुन काम पाहीले.
बातमी सौजन्य : श्री. एस. सुर्यवंशी सर
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




