अभिवादन नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव

शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर

तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

अभिवादन तळोदे विद्यार्थी कॉर्नर स्थानिक वार्ता

कोठार आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा

तळोदा : कोठार ता.तळोदा येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आपल्या मुलांनी व्यक्त केलेल्या अनोख्या कृतज्ञतेने पालक भारावून गेले.         श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी कोठार येथील आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला जातो. बुधवारी बुधवारी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश वाणी होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक […]

अभिवादन शहादा सामाजिक

माता रमाईंचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी शहाद्यात १२८ वी जयंती उत्साहात साजरी.

शहादा,दि.०७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीन-दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘त्यागाची मूर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर (कुकडेल) भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.     प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदना कार्यक्रमाची सुरुवात माता […]

अभिवादन संपादकीय

रमाई आंबेडकर : सामाजिक परिवर्तनामागील मौनातील संघर्ष

इतिहासात अनेकदा सामाजिक परिवर्तनाची नोंद मोठ्या नेतृत्वाच्या नावाने होते; मात्र त्या परिवर्तनामागे उभ्या असलेल्या असंख्य मूक आधारस्तंभांकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे रमाई आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक क्रांतीमागे रमाई आंबेडकर यांचे योगदान हे मौनातले, पण अत्यंत निर्णायक होते. रमाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी […]