धुळे

मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले

धुळे – महापालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची मोठी कसोटी लागली होती. निवडणुकीच्या तोंडावर ‘सोयीचे राजकारण’ करत तंबूत शिरलेल्या उमेदवारांना मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. यात पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या ९ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी १४ जणांना मात्र पराभवाची नामुष्की सोसावी लागली आहे.

शहरातील १९ प्रभागातील ७० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपामध्ये ५५० इच्छुक होते. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेत्यांना उमेदवारी देतांना तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यात ऐनवेळी पक्षप्रवेश घेतलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत ऐनवेळी तंबू बदलत पक्षांतर केले. त्यात भाजपात आलेल्या ९ जणांना फायदा झाला तर १४ प्रमुख उमेदवारांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. मतदारांनी या आयाराम-गयारामां’ना नाकारल्याचे चित्र या निकालावरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *