“राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस…” हे शब्द होते दिवंगत अजित पवार यांचे. आपल्या सहकाऱ्याची मोठ्या भावासारखी काळजी करणाऱ्या दादांच्या या सल्ल्याची आठवण सांगताना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना अश्रू अनावर झाले.
अजित पवार धुळ्यात आल्यावर हक्काने कदमबांडे यांच्याकडे जेवायला थांबत असत. एका जेवणाच्या पंगतीवर गप्पा मारताना दादांनी राजवर्धन यांना सुरक्षेच्या कारणास्तव छोट्या विमानाने प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. मीसुद्धा शक्यतो असा प्रवास टाळतो, असेसुद्धा दादांनी सांगितले होते. इतरांना सावध करणाऱ्या दादांचा त्याच छोट्या विमानाने आज घात केला. ज्या संकटाची भीती दादांना वाटत होती, दुर्दैवाने त्याच संकटाने महाराष्ट्राच्या एका कणखर नेतृत्वाचा प्रवास कायमचा थांबवला.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.


