जळगाव

शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं

जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर साकरी गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले होते.

साकरी येथील दोन अल्पवयीन मुली आज नेहमीप्रमाणे घराकडून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी गावातीलच रोहन चौधरी नावाच्या एका माथेफिरू तरुणाने या मुलींना वाटेत अडवले. काही समजण्याच्या आतच त्याने या दोन्ही मुलींना जवळच असलेल्या शेतातील विहिरीत ढकलून दिले. मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *