अक्कलकुवा विद्यार्थी कॉर्नर शैक्षणिक

मोलगी येथे इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मोलगी : इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, मोलगी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा (पोलीस स्टेशन मोलगी) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल वसावे, संस्था संचालक भरत वसावे, रायसिंग पाडवी, अ‍ॅड. रामचंद्र वसावे, सुमित्रा वसावे, मानसिंग वसावे, किसन पाडवी, ब्रिजलाल पाडवी (बार्टी, पुणे), रामजी पाडवी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपली कला आणि सर्जनशीलता सादर केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संघभावना आणि शिस्त यांचे उत्कृष्ट दर्शन घडले. लहान गटातील विद्यार्थ्यांनी नृत्य व गीतांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर सादरीकरणांना विशेष दाद मिळाली. नाटिका आणि समूहगीतांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच आत्मविश्वासाने केले. शाळेच्या शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *