तळोदे धर्म स्थानिक वार्ता

तळोदा शहरात शिवभक्तांच्या कलश यात्रेने वेधले लक्ष

तळोदा : शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन काढलेल्या यात्रेने लक्ष वेधून घेतले.
       तळोदा शहरातील आशिष पार्क परिसरात  श्री देवेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सायंकाळी कलश यात्रा काढण्यात आली.
    या कलश यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी,प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी,सुनिता वाणी,नगरसेविका जयश्री महाले,डॉ.स्वप्नील बैसाणे रमेश वाणी,रवींद्र वाणी,गुलाबराव चव्हाण,प्रेमराज शर्मा,अनिल कोचर, संजय वाणी,दीपक कलाल,अंबालाल साठे,अविनाश मराठे,कमलेश बच्छाव,दिलीप पाटील,आनंद शहा,धनराज जैन,जगन मराठे,ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
          या कलश यात्रेत मोठ्या संख्येने महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग घेतला. भक्तिमय गीत गात महिलांनी कलश यात्रेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मंगल वाद्यांच्या तालासुरात निघालेल्या या यात्रेच्या बिरसा मुंडा पुतळ्याला वळसा घालून मंदिर प्राणप्रतिष्ठा ठिकाणी समारोप करण्यात आला
            आज गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, मातृका पूजन व मंडप स्थापना होईल. दुपारी १२ वाजता मूर्ती संस्कार, सायंकाळी ६ वाजता धान्याधिवास आणि रात्री ७ वाजता महाआरती होणार आहे.
फाल्गुन शुद्ध ३ शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मूर्ती स्थापना सोहळा पार पडणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याचे अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष पार्क नागरिक व शिवभक्त  मंडळाचे भाविक परिश्रम घेत आहेत.भाविकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *