मुंबईच्या गोरेगाव येथे एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये भयंकर घटना घडली. बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक भयंकर स्फोट झाला आणि लिफ्टमधले तीन जण जखमी झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांनुसार एक तरुणी एका लिफ्टमध्ये शिरताना दिसते. जिच्या हातात एक सुटकेस आहे. तिच्यामागोमाग एक फुगे विक्रेता गॅसनं भरलेले फुगे एका भल्यामोठ्या पिशवीतून घेऊन आत येतो. त्यापाठोपाठ आणखी एक मुलगा लिफ्टमध्ये येतो. लिफ्टचा दरवाजा बंद होणार तितक्यात मोठा स्फोट होतो. ज्यात लिफ्टमधले हे तिघंही जण जखमी झालेले दिसतात. तिघंही लिफ्टमधून बाहेर आले. तरुणीच्या हातात असलेली सुटकेस लिफ्टमध्ये तशीच राहते. सुटकेसचं बाहेरील आवरणही वितळलेलं पाहायला मिळतंय यावरुन स्फोटाची दाहकता लक्षात येते.
समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर गोरेगाव पोलिसांनी गॅस फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच अशाप्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस फुगे घेऊन प्रवास करणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे उदाहरण म्हणता येईल.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

