सिंधुदुर्ग

देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

अवघ्या महाराष्ट्राचे आणि जगभरातील कोकणी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या उत्सवासाठी अवघी आंगणेवाडीनगरी नटली असून तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी देण्यात आली असून, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. ‘पावशी’ (देवीचा कौल) मिळाल्यापासून सुरू झालेली ही तयारी आता पूर्णत्वास आली आहे.
भाविकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून ‘झिग-झॅग’ पद्धतीने लोखंडी रेलिंगचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. उन्हापासून बचावासाठी रांगेवर शेड उभारण्यात आली आहे. गाड्यांच्या पार्किंगसाठी सुमारे ५० एकर पेक्षा जास्त मोकळी जागा आरक्षित केली आहे. मसुरे आणि मालवण मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *