सांगली

मतदानासाठी प्रशासन सज्ज झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १८ लाख १८ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी दोन हजार ३९ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी २४८ झोनल अधिकारी आणि आठ हजार ९७९ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, जिल्ह्यात एकूण दोन हजार ३९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी २४८ झोनल अधिकारी व ८,९७९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या १८ लाख १८ हजार ७४२ इतकी असून, यामध्ये स्त्री, पुरुष व इतर मतदारांचा समावेश आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसह अधिकारी, कर्मचारी हजर होणार आहेत. मतदान शांततेत होण्यासाठी १० तालुक्यांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या (तालुकानिहाय)
आटपाडी – १५२
जत – २९२
खानापूर – १३०
कडेगाव – १४८
तासगाव – २०१
कवठेमहांकाळ – १३०
पलूस – १२९
वाळवा – ३६०
शिराळा – १७१
मिरज – ३२६
एकूण : २,०३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *