वर्धा

१२ हजार शिक्षक आपापल्या जिल्ह्यात परतणार; आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरू

गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात बदलीने जाता येणार आहे.

आता ग्रामविकास विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत प्रधान सचिवांनी ६ जानेवारीला सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक घेउन सूचना दिल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्ययावत करण्याच्या कालमर्यादित सूचना द्याव्या, जिल्ह्यात पेसा क्षेत्रात २०, तर बिगर पेसा क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता उपलब्ध करून द्यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करावी, ३१ मे २०२६ अखेरपर्यंतची रिक्त पदे गृहीत धरावी, बदलीकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करावे, ही प्रक्रिया शिक्षक भरतीपूर्वी राबवावी, आदी मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *