तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘अँथ्रोपिक’ने नुकतेच एक नवीन AI टूल लाँच केले आहे, ज्यामुळे भारतीय आयटी क्षेत्राच्या भविष्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या नवीन ‘एजंटिक एआय असिस्टंट’मुळे केवळ शेअर बाजारातच नाही, तर आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
अँथ्रोपिकचे हे नवीन सिस्टिम फाइल्स वाचणे, दस्तऐवज ड्राफ्ट करणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक जटिल कामे करण्यास सक्षम आहे. यामुळे डेटा एन्ट्री, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि बेसिक कोडिंग सारख्या एंट्री लेव्हल कामांसाठी आता मानवी वर्कफोर्सची गरज कमी भासू शकते. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांसमोर यामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार?
तज्ज्ञांच्या मते, जे आयटी कर्मचारी वारंवार केल्या जाणाऱ्या कामांवर अवलंबून आहेत, त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की नोकऱ्या संपतील. उलट, नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.
भविष्यात ‘या’ कोर्सेसना असेल मोठी मागणी
एआयच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता जुन्या कोर्सेसपेक्षा नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रामुख्याने खालील क्षेत्रांत नोकऱ्यांच्या संधी वाढतील: प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, एआय सेफ्टी आणि एथिक्स, मशीन लर्निंग ऑप्स आणि ह्यूमन-एआय कोलॅबोरेशन.
अपस्किलिंग हाच एकमेव पर्याय
केवळ तांत्रिक ज्ञान असून चालणार नाही, तर क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डोमेन नॉलेज यांसारख्या सॉफ्ट स्किल्सना अधिक महत्त्व प्राप्त होईल. एआयला घाबरण्याऐवजी त्याच्यासोबत काम करण्याची कौशल्ये आत्मसात केली, तर आयटी क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक उत्तम संधी उपलब्ध होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.



