मुंबई उपनगर

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटदारांची बिले अदा करण्यापासून शासकीय जमिनीच्या भाडे पट्टी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ ला मान्यता देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर – गोंदिया, भंडारा – गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *