बीड

बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

आरोग्य विभागातील भरती घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्यसेवक (क) या पदाचे बोगस नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारांची १५ ते १७ लाख रुपयांना फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बोगस आदेशांवर चक्क उपसंचालकांच्या पत्रावर धाराशिवच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी स्कॅन करून लावण्यात आली आहे. हेच आदेश आता हाती लागले आहेत.

या रॅकेटने फसवणुकीसाठी कागदपत्रांचा बनाव रचला आहे. काही उमेदवारांना दिलेल्या आदेशावर ‘उपसंचालक कार्यालय, धाराशिव’ असा उल्लेख आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, धाराशिव येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालयच अस्तित्त्वात नाही; धाराशिवचा कारभार लातूर उपसंचालक कार्यालयातून चालतो. तसेच पुणे उपसंचालक कार्यालयाच्या नावे देण्यात आलेल्या आदेशाचा फॉरमॅटही पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप तरी उमेदवारांनी याची लेखी तक्रार कोठेही दिली नसली तरी त्यांची धावपळ मात्र सुरू झाली आहे. हे उमदेवार बीडच नव्हे तर धाराशिव, यवतमाळ, पुणे, बुलढाणा, जालना आदी जिल्ह्यांतील असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *