हिंगोली

वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून ‘वरात’

काही दिवसांपूर्वी वसमत येथील कोर्टा पाटी परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाला लुटून पसार होणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तपास प्रक्रियेसाठी या आरोपींना मंगळवारी (१३ जानेवारी) वसमत शहरात आणले असता, पोलिसांनी त्यांची शहरातून ‘वरात’ काढली. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वसमत शहरातून आंबा चौंडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड घेऊन जाणाऱ्या बँक मॅनेजरवर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना लुटले होते. या धाडसी दरोड्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *