यवतमाळ

पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला

खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या दोघांचा साखरपुडा सोहळा झाला. लग्नाच्या तयारीला वेग आला. त्यात मुलीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती, त्या पूजेसाठी तो यवतमाळला आला. त्यावेळी घरी कोणी नसताना तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर एकदा प्रवासातही बलात्कार केला. हे सगळं घडल्यानंतर त्याने हुंड्याचे पैसे आताच द्या म्हणत लग्न मोडले.

या प्रकरणी पीडित मुलीने लोहारा पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणासह हुंड्याची मागणी करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *