गुन्हेगारी तळोदे नंदुरबार महाराष्ट्र

तळोद्यात पेट्रोल शिल्लक असूनही वितरण बंद;


प्रशासनाचे आदेश की पेट्रोल पंपचालकांची साठेबाजीसाठी मनमानी?

तळोदा : सर्वत्र इंधन टंचाईचे संकट उभे राहिले असताना तळोद्यात मात्र पेट्रोल शिल्लक असूनही पेट्रोल पंप चालक प्रशासनाचे कारण पुढे करून पेट्रोल वितरणाला टाळाटाळ करत  असल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांनी रात्री  इंधन वितरण बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे कारण पुढे करण्यात येत असून रात्रीतून साठेबाजी व प्राप्त झालेल्या इंधन साठ्याच्या काळाबाजार, यासाठी तर रात्रीचे वितरण प्रशासनाशी साटे-लोटे करून बंद करण्यात आले नाही ना ?  असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
         देशात सर्वत्र इंधन त्यांच्यामुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. इंधनाचा वापर कमी करावा व इतर पर्यायी साधनांचा वापर करावा यासाठी शासनाकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन व जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना आवश्यकतेनुसार इंधन पुरवठा करण्यासाठी देखील शासन आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे.
       मात्र, याची विपरीत परिस्थिती तळोदा शहरात पाहायला मिळाल आहे. तळोदा शहरात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील जे एस पेट्रोल पंप पेट्रोलचे टँकर आले व त्याच वेळी पेट्रोल पंपच्या टॅंक मध्ये खाली करण्याचे काम करण्यात येत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. मात्र, पेट्रोल किती प्राप्त झाले? केवढे खाली केले गेले? याबाबत  प्रत्यक्षदर्शीकडून साशंकता उपस्थित करण्यात येत होती. पेट्रोल पंपावर पेट्रोल प्राप्त झाले हे अनेक नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले व त्यानंतर ते पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पेट्रोल गेले तर त्यांना पेट्रोल सकाळी मिळेल, असे सांगण्यात आले. याबाबत विचारणा केली असतांना तहसीलदारांचे तसे आदेश असल्याचे सांगण्यात आले. याबाबत लेखी आदेश आहेत का? अशी विचारणा केली असता पेट्रोल पंप मालकाने अरेरावीच्या भाषेत तोंडी आदेश दिले आहेत, असे विचारणा करणाऱ्यांना सांगितले.
        याबाबत तुम्ही तहसीलदारांना विचारणा करा, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. अत्यावश्यक कामांसाठी फक्त शासकीय वाहने व रुग्णवाहिका यांना पेट्रोल मिळेल असे देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. यासोबतच सुरक्षा कारणे देखील पुढे करण्यात आली.
          दरम्यान, या सर्व प्रकात्यामुळें पेट्रोल पंप चालकांच्या भूमिकेविषयी उपस्थितांमध्ये साशंकता निर्माण झाली. पेट्रोल शिल्लक असताना देखील वितरणाबाबत विविध कारणे पुढे करून पेट्रोलच्या काळाबाजार करण्यासाठी तर अशा प्रकारचे कारणे पुढे करण्यात येत आहेत की काय? असा प्रश्न आता नागरिकांपुढे उपस्थित झाला आहे. यासोबतच शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असताना ते देखील वितरण करत नाहीत अशा पद्धतीचे उत्तरे नागरिकांना देण्यात आली.
        त्यामुळे तळोदा शहरात खरोखर पेट्रोल टंचाई आहे की पेट्रोल पंप चालक साठेबाजार करण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत का? पेट्रोलची काळ्या बाजारात विक्री जादा दरात विक्री साठी वाढ त्यातून नादाखोरीसाठी असला घाट घातला जात आहे का? असा प्रश्न अनेकांचा मनात निर्माण होत आहे. या प्रकारामुळे तळोदा शहरातील जे एस पेट्रोल पंपचालक सह अन्य कृत्रिम टंचाई निर्माण करून वेठीस धरत आहेत का? असा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पुरवठा विभागाने देखील आवश्यक त्या गाईडलाईन स्पष्ट करून असून नागरिकांना सूचित करणे गरजचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *