पत्रकार परिषद : विकासकामांत अडथळे आणले जात आहेत : योगेश चौधरी
तळोदा : भाजपमधील काँग्रेसवासीयांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केल्यानेच मी पक्ष सोडला. आता टपऱ्यांत बसणारे लोक आमदार राजेश पाडवी यांचे कान भरत असून, आमदार शहानिशा न करता माझ्या कुटुंब व व्यवसायाला टार्गेट करत आहेत, भाग्यश्री चौधरी यांचे नगराध्यक्षांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न झाला, पण उच्च न्यायालयाने आम्हाला जुन्या पद्धतीने कामाचा दिलासा दिला आहे. मुख्याधिकारी केवळ पैशांसाठी आमदारांच्या दबावाखाली निकृष्ट कामांची बिले काढत आहेत. असा थेट आरोप राष्ट्रवादीचे नेते योगेश चौधरी यांनी केला.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, कल्पेश चौधरी, प्रतिभा पाडवी, गायत्री माळी, रामानंद ठाकरे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. घरपट्टी वाढ, नगराध्यक्षांचे अधिकार, नगरपरिषदेचे कामकाज, न्यायालयीन आदेश तसेच विविध विकासकामांबाबत निर्माण झालेल्या वादांवर योगेश चौधरी यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी यांनी स्पष्ट केले की, निवडणुकी पूर्वी काँग्रेस मधून आलेल्याना मी भाजपात नको होतो त्यांना आमदारांना चुकीची माहिती दिली व माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वर्षांपासून बीजेपी विचाराच्या मी जोडलो होतो त्यामुळे पक्ष सोडताना मला दुःख झाले. टपऱ्यात बसणारे आमदारांचे कान भरतात आणि आमदार शहानिशा न करता ते ऐकतात याचे वाईट वाटते. पालिकेत निकृष्ट कामे करणाऱ्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर आर्थिक दंड दिला. आम्ही लोकांच्या हिताचा विचार करूनच कामे केले, कॉन्ट्रॅक्ट्रानी योगेश चौधरीकडे जाऊ नये असे दम भरण्यात आले. जिल्हाधिकारीकडे केलेल्या पत्रव्यवहारामुळे नगराध्यक्षांच्या आर्थिक अधिकारांबाबत नाहक संभ्रम निर्माण करण्यात आला होता. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच म्हणजेच नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार करण्याचे निर्देश दिला. मात्र याच कालावधीत ज्या ठेकेदारांच्या कामांच्या चौकश्या सुरू आहेत ते लाखोंचे बिले काढण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडून आल्यानंतर विकासकामांना गती दिली जात असताना, विरोधकांकडून राजकीय सूडबुद्धीने ठेकेदारांवर दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप चौधरी यांनी केला. राजकीय संघर्ष आता थेट कुटुंब आणि व्यवसायापर्यंत पोहोचला असून, माझे वडील ऍडमिट असताना माझ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची मागणी केली. सातत्याने आमदार यांनी खोट्या तक्रारी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. आपल्यावरील व शैक्षणिक संस्थांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे सर्व आरोप फेटाळून लावले. यासोबतच शहरातील घरपट्टी वाढीची प्रक्रिया ही पूर्णपणे प्रशासकीय कार्यकाळातच झाली होती. त्यामुळे या करवाढीसाठी विद्यमान नगराध्यक्ष अथवा विद्यमान नगरपरिषद कोणत्याही प्रकारे जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय काळात प्रलंबित असलेली अनेक विकासकामे आम्ही सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. नमो गार्डन, खडी नदी गटार यांसह इतर विकासकामांबाबत बोलताना, शहरात निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. निकृष्ट दर्जाच्या कामांना आमचा तीव्र विरोध असून, अशी कामे झाली असल्यास त्यांची बिले मुख्याधिकाऱ्यांनी का काढली? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच, काम झालेच पाहिजे; मात्र ते दर्जेदार झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामांमुळे ठेकराना नोटिसा बजावण्यात आल्या असून, संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २२ लाख रुपयांची वसुली केल्याचा दावाही त्यांनी केला. यामुळे शहरात जोरदार चर्चा होत आहे.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




