नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने तालुक्यात खडबड उडाली असून चिमुकल्याचा मृत्यूने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. दरम्यान आश्रम शाळेत पाहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील आश्रम शाळेतील आयान अंकेश गावित (वय ६) असे मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दरम्यान खडकी आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची निवासी शाळा असून या मुलांना येथेच राहण्याची व्यवस्था आहे. तर सहा वर्षीय विद्यार्थी आयान हा बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला होता. याच ठिकाणी तो खाली पडला होता. दरम्यान आयान हा खाली पाडल्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रम शाळेतील अधीक्षक यांना मिळाली. त्यांनी लागलीच या विद्यार्थाला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत्यु घोषित केले अशी माहिती शासकीय आश्रम शाळा खडकी येथील अधीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे. दरम्यान आश्रम शाळेतील या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूच्या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला. तर घटनेची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि दोषी आढळल्यास दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
