राष्ट्रीय

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत”; प्रियांका गांधींचा पलटवार

खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधी पक्षाचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनपेक्षित घटना घडवण्याचा कट रचत आहेत हा दावा “पूर्णपणे खोटा आणि मूर्खपणा” असल्याचे सांगत फेटाळून लावला. पंतप्रधान आता सभापतींच्या मागे लपून बसले आहेत असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. पंतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नसताना ते सभापतींना खोटे बोलण्यास भाग पाडत आहेत असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला आहे.

“पंतप्रधान लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून बसले आहेत आणि त्यांना हे सर्व सांगायला लावत आहेत. पंतप्रधानांना सभागृहात येण्याची हिंमत नव्हती. ते सभागृहात आले नाहीत कारण त्यांच्या आसनासमोर तीन महिला खासदार उभ्या होत्या. हा कसला मूर्खपणा आहे?, असा सवालही गांधी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *