Economy राष्ट्रीय शेतकरी

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी, प्रति कर्जदार २ लाखांपर्यंत शिथिलता आणण्याची तरतूद

 

भारतीय रिझर्व्ह बँकेनं किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी केला आहे, यामध्ये पात्र शेती कर्ज घटकांमध्ये माती परीक्षण, हवामान अंदाज आणि सेंद्रिय प्रमाणन यासारख्या कृषी-तंत्रज्ञान उपक्रमांवरील खर्चाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

१३ फेब्रुवारी, नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी केला आहे, यामध्ये पात्र शेती कर्ज घटकांमध्ये माती परीक्षण, हवामान अंदाज आणि सेंद्रिय प्रमाणन यासारख्या कृषी-तंत्रज्ञान उपक्रमांवरील खर्चाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.      

 या मसुद्यात प्रति कर्जदार २ लाख रुपयांपर्यंतच्या कृषी आणि संलग्न कर्जांसाठीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याची तरतूद आहे. एक हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी  १० हजार ते  ५० हजार रुपयांची कर्ज देण्याचं प्रस्तावित आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *