राजकारण

मालेगाव महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड

मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.

७ फेब्रुवारी, मालेगाव :  मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख यांना ४३ मते मिळाली. त्यांनी लता घोडके यांचा २५ मतांनी पराभव केला.   उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेचे निलेश काकडे यांचा पराभव केला. शिवसेनेच्या काकडे यांना १८ मते मिळाली, तर समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांना ४३ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसंच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *