मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात श्रीगुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्हे व एक वर्धा जिल्हा अशा ठिकाणी दिवंगत लोकनेते अजित पवार यांचा अस्थिकलश पोहोचविण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव (संघटन) आ. संजय खोडके यांच्यावर सोपविण्यात आली.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

