एचएमटी धानाचे जनक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांची २०१० मध्ये जागतिक स्तरावर ‘फोर्ब्स’ने दखल घेतली. मात्र, त्यांच्याकडे हक्काची जमीन नव्हती. दादाजींची संशोधन कीर्ती ऐकून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नांदेड गाठले. ऑन स्पॉट निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खोब्रागडेंना पाच एकर जमीन व रोख पाच लाख दिले. अजित दादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकताच जिल्हाभरातील अनेकांना चटका लावून गेला. ३ जून २०२३ ही दादांची चंद्रपूर जिल्ह्याची अखेरची भेट ठरली आहे.
पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्व. दादाजी खोब्रागडे यांचे एचएमटी वाण तपासण्यासाठी घेतले. पण, त्याचे श्रेय दादाजींना देण्याऐवजी विद्यापीठाने हे वाण पीकेव्ही एचएमटी या नावाने बाजारात आणले. तेव्हापासून दादाजींचा विद्यापीठाशी संघर्ष सुरू होता. अजित दादांनी ६ डिसेंबर २०१० रोजी नांदेड येथील भेटीत याबाबत संपूर्ण तपशील जाणून घेतला. घटनास्थळावरूनच त्यांनी मोबाइलने संबंधितांशी चर्चा केली. अखेर या संघर्षात दादाजींचा विजय झाला. त्यानंतर या सर्व वाणांना केवळ विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उचलून धरले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

