
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.
७ फेब्रुवारी, मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख यांना ४३ मते मिळाली. त्यांनी लता घोडके यांचा २५ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेचे निलेश काकडे यांचा पराभव केला. शिवसेनेच्या काकडे यांना १८ मते मिळाली, तर समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांना ४३ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसंच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




