पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेने फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी करीत पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केली.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,अनिल नाईक,प्रकाश म्हात्रे ,देवेंद्र मढवी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.१३ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना केतन भगत यांची व्हिप अनिवार्य असणार आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी १० टक्के संख्याबळ विरोधकांकडे असणे गरजेचे आहे. ते संख्याबळ दोन पक्षाकडे असल्याने विरोधीपक्ष नेते पद या दोन पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, १ स्वीकृत नगरसेवक देखील या दोघांना निळणार आहे.शिवसेना ठाकरे गट सोबत आल्यास आणखी एक स्वीकृत नगरसेवक महाविकास आघाडीला मिळणार आहे. स्वतंत्र गट स्थापन केलेल्या ठाकरे गटाला देखील विरोधीपक्ष नेते पद हवे असल्याने महाविकास आघाडी मधील नेते पुढील काळात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेस आणि शेकाप नगरसेवकांचा एकत्रित गट स्थापन करून केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केल. आहे. मागील वेळेला प्रीतम म्हात्रे यांची गट नेते आणि विरोधीपक्ष नेते पदावर निवड केल्यानंतर आमच्या समोर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुढील काळात तसे होणार नाही. गटनेत्यांचा व्हीप सर्व नगरसेवकांना बंधनकारक असेल.
– बाळाराम पाटील (शेकाप नेते)
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

