उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे उत्पादनात अवाजवी घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.
हार्वेस्टरमुळे उत्पादनात घट प्रत्यक्षात कापणीदरम्यान होणारी हानी असते. ही हानी प्रामुख्याने शेतजमीन समतल नसणे, शिफारसीनुसार ओळीतील अंतर नसणे, ऊस आडवा पडलेला असणे, बेस कटरची उंची चुकीची असणे, अपुरी ओलावा स्थिती, प्रशिक्षित ऑपरेटरचा अभाव यामुळे होते. ही सर्व कारणे व्यवस्थापनाशी संबंधित असून हार्वेस्टर तंत्रज्ञानातील दोष नाहीत. भारतीय कृषी संशोधन संस्था, राज्यातील कृषी विद्यापीठे व साखर कारखान्यांच्या अभ्यासानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी साधारण २ ते ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने केलेल्या कापणी इतकीच आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

