अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यानंतर भारताच्या तेल खरेदी धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. भारतानेरशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, 140 कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी रशिया, अमेरिका, व्हेनेझुएला यांसह सर्व पर्याय खुले ठेवले जातील.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

