सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?” असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला.
सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. “आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळाने ज्या विमानावर एक वर्षापूर्वी बंदी घातली होती, तेच विमान अजित दादांच्या प्रवासासाठी का वापरले गेले? स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक असणारे दादा अशा विमानातून प्रवास कसा काय करतील?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

