नोकऱ्या आहेत, ती करण्याची मानसिकता नाही. बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता. मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही. कोण म्हणत आहे की, काम नाही. काम आहे. तरुणांना राग आला तर आला. कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचे तेव्हा बघ, असे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावातील एका कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आपण नुसत्या गोष्टी ऐकतो अंबानी असा होता तसा होता, त्यांनी पण शून्यापासून सुरुवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पण प्रयत्न करून बघा ना, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. मी काय राजकारणी होतो का? मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.


