झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या तुफानी खेळी केली आहे.
Story Line :
SHABD,Mumbai, February 6,
6 फेब्रुवारी, नवी दिल्ली :
झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ८ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला आहे.
वैभवनं अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीनं १७५ धावा केल्या. त्याला कर्णधार आयुष म्हात्रेनं ५३, तर अभिज्ञान कुंडूनं ४० धावांची साथ दिली. भारताकडून सध्या मैदानावर कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल हे फलंदाजी करत आहेत.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.



