बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी, म्हणजेच ९ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावासाठी किमान ५० खासदारांचे समर्थन आवश्यक असते. त्यानंतर पीठासीन अधिकारी या प्रस्तावावर चर्चा घडवून आणू शकतात. ओम बिर्ला यांनी मंगळवारीच लोकसभा सरचिटणीसांना या प्रस्तावाची कायदेशीर तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मंगळवारी दुपारी १:१४ वाजता ‘नियम ९४सी’ अंतर्गत लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ११८ खासदारांनी या नोटीसवर स्वाक्षरी केली असून अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या जागेपर्यंत येऊन अनुचित प्रकार करतील, अशी माहिती मिळाल्यामुळे मीच मोदींना सभागृहात न येण्याची विनंती केली, असे विधान बिर्ला यांनी केले होते; यावरूनही विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
आता ९ मार्चला संसदेत काय घडते आणि ओम बिर्ला यांच्या भवितव्याचा काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




