तळोदा : कोठार ता.तळोदा येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आपल्या मुलांनी व्यक्त केलेल्या अनोख्या कृतज्ञतेने पालक भारावून गेले.
श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी कोठार येथील आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला जातो. बुधवारी बुधवारी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश वाणी होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक रवींद्र वाणी उपस्थित होते कार्यक्रमाला प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे,निंबा रावडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे औक्षण करून ओवाळणी केली. त्यानंतर पायावर डोके ठेवून विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना नतमस्तक झाले. आपल्या मुलांची कृती पाहून उपस्थित विद्यार्थ्यांचे आई-वडील भावुक झाले. भावनिक प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावलेले दिसून आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे महती सांगणारे गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे यांनी केले. अध्यक्ष भाषणात रमेश वाणी यांनी आई-वडील आपले जीवनाचे शिल्पकार असून त्यांच्याबद्दल आपण शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहिला पाहिजे असे सांगितले. सोबतच त्यांनी आई-वडिलांच्या कृतज्ञता लक्षात घेऊन वृद्धपणी त्यांचा आधार होण्याच्या देखील मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांवर मूल्य शिक्षणाचे कृतिशील संस्कार व्हावेत यासाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून मातृ-पितृ पूजन समारंभ फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो. या सोहळ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांकडून पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची ओवाळणी करण्यात येते. हे संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर जीवन उपयोगी ठराविक यासाठी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो या उपक्रमाचे इतर ठिकाणी देखील अनुकरण करण्यात आले असून उपक्रम म्हणून याच्याकडे बघितले जाते.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




