राष्ट्रीय

जागतिक रेडिओ दिन : सर्वांना जोडणारा ‘विश्वसनीय आवाज’, पंतप्रधान मोदींकडून रेडिओ माध्यमाचे कौतुक

आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ या प्रसारमाध्यमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

१३ फेब्रुवारी, नवी दिल्ली : आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ या प्रसारमाध्यमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

सामाजिक माध्यम ‘एक्स’वर संदेश देताना पंतप्रधानांनी रेडिओला “विश्वसनीय आवाज” असे संबोधले. दुर्गम गावांपासून ते गजबजलेल्या शहरांपर्यंत लोकांना जोडणारे प्रभावी माध्यम म्हणजे रेडिओ असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षानुवर्षे रेडिओने वेळेवर माहिती पोहोचवली असून, प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देत सर्जनशीलतेला चालना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम  मन की बात या कार्यक्रमाचा उल्लेख केला. हा कार्यक्रम नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ म्हणून विकसित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *