तळोदा : शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
फाल्गुन शुद्ध १ बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कलश यात्रा काढण्यात येणार आहे. फाल्गुन शुद्ध २ गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, मातृका पूजन व मंडप स्थापना होईल. दुपारी १२ वाजता मूर्ती संस्कार, सायंकाळी ६ वाजता धान्याधिवास आणि रात्री ७ वाजता महाआरती होणार आहे.
फाल्गुन शुद्ध ३ शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मूर्ती स्थापना सोहळा पार पडणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याचे अपेक्षित आहे.
हा सोहळा श्री देवेश्वर महादेव मंदिर, आशिष पार्क, बस स्टँड मागे, तळोदा येथे संपन्न होणार असून कार्यक्रमाचे संयोजन सौ. सुनीता शशिकांत वाणी व डॉ. शशिकांत जगनाथ वाणी यांनी केले आहे. आशिष पार्क नागरिक व शिवभक्त मंडळ तळोदा यांच्या वतीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




