नंदुरबार शैक्षणिक स्थानिक वार्ता

शिक्षिकांप्रती महिला दिनानिमित शिक्षण विभागाची अनोखी कृतज्ञता

१०० शिक्षकांचा सन्मान ; वैद्यकीय मार्गदर्शन


तळोदा : शिक्षण विभाग तळोदा यांच्या प्रेरणेने महिला दिनानिमित्त तालुक्यातील 100 महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बुधावल (ता. तळोदा) येथे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या प्रेरणेने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
         कार्यक्रमाला डागा हॉस्पिटलच्या प्राची जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, आहार आणि मासिक पाळी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व महिला शिक्षिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे स्पर्धा, कविता गायन तसेच मनोगते सादर करून वातावरण उत्साही केले.
       या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी मुलांच्या प्राथमिक शिक्षणात शिक्षिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. महिला घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे सांभाळतात तसेच स्त्रियांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण विभागातील जाधव यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीलिमा बोरसे व सुरक्षा वसावे यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी व केंद्रप्रमुख रंजना निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
       यावेळी सरपंच लक्ष्मीताई नाईक, उपसरपंच मंगलसिंग पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलसिंग पाडवी, उपाध्यक्ष दिलीप वसावे, मुख्याध्यापक राजू गुरव, शिक्षक संदीप काकुस्ते, संदीप वसावे, शितल शिंदे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
       कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, वसंत जाधव, ज्ञानदेव केदार, जगन्नाथ मराठे व केंद्रप्रमुख रंजना निकुंबे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *