अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम शाळेचे हे विद्यार्थी होते. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेऊन जाण्यासाठी ही बस आली होती. बसमध्ये विद्यार्थी भरलेले असताना दुपारी मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर हा अपघात झाला. तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा तोल सुटल्याने बस खोल दरीत उलटली. काही विद्यार्थी बसखाली दबले गेल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




