विटा : खानापूर मतदारसंघातील शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे लाजिरवाणी आहे.
आमदार बाबर हे आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. याचीच आम्हाला लाज वाटते. खरे तर राजकारणात टीका करीत असताना आपल्या कुवतीप्रमाणे व आपल्या बरोबरीच्या लोकांबद्दल बोलणे योग्य आहे. पण, खुद्द मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करायचा व तुझ्या मुख्यमंत्र्यांना सांग २४२ आमदार आहेत, म्हणून तुमचे अस्तित्व आहे, हे बोलणे अहंकारपणाचे आहे.
वाचा: सुहास बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजन यांनी दिला इशारा
उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) तसेच भाजप हे सर्व पक्ष मी चालवतो, हे त्यांचे बोलणे बालिशपणाचे आहे. भारतीय जनता पार्टी मी चालवतो असे त्यांना वाटत असेल तर भाजप त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभी राहिली नसती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुका बिनविरोध झाल्या असत्या. बाप हा बापच असतो. भारतीय जनता पार्टी हा बापच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप नेते माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना दिला.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




