तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने […]
Author: तळोदा वेध खबर
तळोदा येथे श्री देवेश्वर महादेव मंदिरात मूर्ती स्थापना महोत्सवाचे आयोजन
तळोदा : शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिव महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. फाल्गुन शुद्ध १ बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ […]
योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर […]
प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग राजपूत जाणार युरोप कृषी अभ्यास दौऱ्यावर
तळोदा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वर्षी युरोपच्या कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड आदी […]
मोलगी येथे इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
मोलगी : इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, मोलगी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा (पोलीस स्टेशन मोलगी) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल वसावे, संस्था संचालक भरत वसावे, रायसिंग पाडवी, अॅड. रामचंद्र वसावे, सुमित्रा वसावे, मानसिंग वसावे, किसन पाडवी, ब्रिजलाल […]
प्रकल्प कार्यालयात अधीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा, पोलिसांत गुन्हा
तळोदा | प्रतिनिधीतळोदा येथील प्रकल्प कार्यालयात दारूच्या नशेत येऊन आरडाओरड व दमदाटी केल्याप्रकरणी संग्राम मारोती परसोडे (अधीक्षक, शासकीय आश्रमशाळा सरी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तक्रारदार तुषार राम दुर्वे (वय २९), कनिष्ठ लिपिक, प्रकल्प […]
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी, प्रति कर्जदार २ लाखांपर्यंत शिथिलता आणण्याची तरतूद
भारतीय रिझर्व्ह बँकेनं किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी केला आहे, यामध्ये पात्र शेती कर्ज घटकांमध्ये माती परीक्षण, हवामान अंदाज आणि सेंद्रिय प्रमाणन यासारख्या कृषी-तंत्रज्ञान उपक्रमांवरील खर्चाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. १३ फेब्रुवारी, नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सुधारित नियमांचा मसुदा जारी केला आहे, यामध्ये पात्र शेती […]
जागतिक रेडिओ दिन : सर्वांना जोडणारा ‘विश्वसनीय आवाज’, पंतप्रधान मोदींकडून रेडिओ माध्यमाचे कौतुक
आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ या प्रसारमाध्यमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. १३ फेब्रुवारी, नवी दिल्ली : आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ या प्रसारमाध्यमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सामाजिक […]
तळोदा वेध खबर – १३ फेब्रुवारी २०२६
पान क्र. १ पान क्र. २ पान क्र. ३ पान क्र. ४ तळोदा वेध खबरआजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड […]
रांझणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट
तळोदा : श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची क्षेत्रभेट रांझनी जवळील आंब्याच्या शेतात संपन्न झाली. शैक्षणिक धोरणानुसार विध्यार्थ्यांना परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास होण्यासाठी क्षेत्रभेट ही आवश्यक असून शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती व वन्यजीव यांची माहिती या क्षेत्रभेट मध्ये देण्यात आली.विध्यार्थ्यांना या वेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर यांनी व प्राथमिक शिक्षक […]










