तळोदा येथील भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील प्राचार्य गो.हू महाजन न्यू हायस्कूल येथे जागतिक कर्करोग दिन निमित्त सामाजिक प्रबोधन पर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूलचे प्राचार्य डॉ.अमरदीप महाजन हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून धडगाव चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल चौधरी दंतचिकित्सक डॉ.गौरव शुक्ला प्रा.भगवान चीने डॉ.नारायण जाधव भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन प्रा.पूजा जैन उपमुख्याध्यापक सुनील. एस. सूर्यवंशी, प्रा राजाराम राणे ,शरद सूर्यवंशी, रमेश कुमार भाट ,चेतन धानका, भारतीय जैन संघटनेचे संघटनेचे शहराध्यक्ष राकेश जैन आदी उपस्थित होते प्राचार्य गोहू महाजन भाईसाहेब न्यू हायस्कूल सरस्वतीदेवी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. कांतीलाल पावरा प्रा. भगवान चिने वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल चौधरी, डॉ. गौरव शुक्ला, एडवोकेट अल्पेश जैन यांनी मार्गदर्शन करताना कर्करोगा पासून बचाव करण्यासाठी करावयाची उपायोजना व त्यापासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे निरोगी जीवनशैली व आहाराचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व्यसनांपासून दूर राहण्याचे युवकांना आवाहन केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन यांनी यांनी सांगितले की युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे चांगल्या गोष्टीचे व्यसन लावावे कर्करोग मुक्ती दिनाचे महत्व जाणून घेऊन हा संदेश घरोघर पोहोचवावा असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले मान्यवरांनी सहयोग सोशल ग्रुप व बीजीएस या सामाजिक सेवाभावी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच.पी चौधरी यांनी केले तर पर्यवेक्षक पी आर वळवी यांनी आभार मानले कार्यक्रमास एस. एन सूर्यवंशी, पी .आर वळवी, एच पी चौधरी एम.जी सोनवणे ,संकेत माळी, के. एल वसावे स्वप्निल महाजन, कल्पेश माळी, एल आर शेंडे के आर सूर्यवंशी, एस एम कुमावत आधी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
बातमी सौजन्य : श्री. एस. सुर्यवंशी सर
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




